महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत संततधार; तीन तालुक्यांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस

गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. चिपळूण,दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

24 तासांत तीन तालुक्यामध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस

By

Published : Jul 27, 2019, 5:18 PM IST

रत्नागिरी - गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. चिपळूण, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

24 तासांत तीन तालुक्यामध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दापोलीत 227 मिलिमीटर, आणि मंडणगडमध्ये 207 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, खेड तालुक्यात 190 मिलिमीटर तर संगमेश्वरमध्ये 193 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जोरदार पावसामुळे ठिकठीकाणी पाणी साचले आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details