महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray Konkan visit : यापुढे कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका, अंगावर आलेच तर शिंगावर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर (MNS President Raj Thackeray Konkan visit) आहेत. यावेळी त्यांनी खेडमधील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन केले.

By

Published : Dec 6, 2022, 7:44 AM IST

Updated : Dec 6, 2022, 8:10 AM IST

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

रत्नागिरी :यापुढे कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका, अंगावर आलेच तर शिंगावर घ्या, मी तुमच्यासाठी वकिलांची फौज उभी करेन, असा विश्वासमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सोमवारी कार्यकर्त्यांना दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) कोकण दौरा करत असून, सोमवारी त्यांनी खेडमध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे

भावनिक आवाहन :कोकणात पक्ष बांधणीसाठी सज्ज व्हा, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. कोकणात संघटनेची मजबूत फळी तयार करण्यासाठी मी कोकणात आलो आहे. यापुढे कोकणात संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचे (MNS President Raj Thackeray Konkan visit) आहे.

राज ठाकरेंची ग्वाही :यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, नगरसेवक भुषण चिखले, नंदू साळवी, रोहन भोजने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित (Raj Thackeray Konkan visit) होते.

असा असेल राज ठाकरे यांचा कोकण दौरा:(Raj Thackerays Konkan tour)राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोकण दौऱ्याची सुरुवात तळ कोकणापासून होणार होता. कोल्हापूरमार्गे राज ठाकरे तळ कोकणात प्रवेश करणार होते. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस वेळ देऊन राज इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. त्यावेळी अनेकांचा मनसेत प्रवेश देखील होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या उगमस्थानात मनसे:शिवसेनेचा जन्मचं मुळात कोकणातून आणि कोकणी माणसांमुळे झाला आहे. आज देखील शिवसेनेत जितके काही पदाधिकारी खासदार, आमदार, नगरसेवक आहेत त्यातले बहुतांश हे कोकणी आहेत. याच कोकणात शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाल्याने मनसे याकडे एक संधी म्हणून बघत असल्याचे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिवसेनेच्या उगम स्थानात मनसेला खरंच पाय रोवता येतील का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Dec 6, 2022, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details