रत्नागिरी -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यातच आता मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. धमकी देणारा फोन हा परदेशातील क्रमांकावरून आल्याचही खेडेकर यांनी सांगितले आहे.
MNS leader threatened : मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना परदेशातून धमकीचा फोन - मनसेचे भोंग्याविरोधात आंदोलन
मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे.
परदेशातून दिली जीवे मारण्याची धमकी -सध्या भोंग्यांवरुन राजकीय वातावरण तापले आहे. वैभव खेडेकर यांनीही आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याचे वैभव खेडेकर यांचे म्हणणे आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी हा फोन परदेशातून आल्याचा आरोप केला आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे.
मनसेचे पहिले नगराध्यक्ष -वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. दरम्यान खेड नगरपरिषद कारभारात गैरवर्तन केल्याप्रकरणी वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात अपात्र केले आहे. याबाबत तत्कालीन शिवसेना गटनेते प्रज्योत तोडकरी व अन्य आठ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.