महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘उत्कृष्ट विधायक’ पुरस्कारासाठी आमदार उदय सामंत यांची निवड - उत्कृष्ट विधायक

२३ जून ला कै. अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

‘उत्कृष्ट विधायक’ पुरस्कारासाठी आमदार उदय सामंत यांची निवड

By

Published : May 31, 2019, 3:38 PM IST

रत्नागिरी- विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवणाऱ्या पुणे येथील नामवंत ब्रम्हकेसरी या मासिकाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट विधायक’ या पुरस्कारासाठी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे. २३ जून ला कै. अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

‘उत्कृष्ट विधायक’ पुरस्कारासाठी आमदार उदय सामंत यांची निवड

ब्रम्हकेसरीच्यावतीने नेमण्यात आलेल्या निवड समितीने राज्यभरातील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यातून म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. शासनाच्या अनेक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.

आमदार उदय सामंत यांच्या आमदार पदाच्या संपूर्ण कारकिर्दीची दखल ब्रम्हकेसरीने घेतली असून रत्नागिरीच्या आमदारांना मिळणारा इतका मोठा पुरस्कार हा रत्नागिरीकरांसाठी भूषणावह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details