रत्नागिरी - चिपळूणवर पुराचे संकट ओढावले आहे. आता पूर ओसरला असला तरी, परिस्थिती अतिशय विदारक झाली आहे. लोक मदतीसाठी टाहो फोडत आहेत. सध्या आभाळ फाटलेल आहे, कुठे ठिगळ द्यावेत अशी परिस्थिती आहे. मात्र, होईल ती मदत आपल्या परीने करण्याचे काम मी करतो आहे. अशी प्रतिक्रियी चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन (Disaster management) मजबुत होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
आमदार शेखर निकम पुरग्रस्तांच्या मदतीला धावले, ईटीव्ही भारत'कडून खास आढावा - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांची पुरग्रस्तांना मदत
चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम हे पुरग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. सध्या चिपळूणममध्ये 25 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच, चिपळूणकरांना मदत कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला आहे. या सर्व परिस्थितीबाबत आमदार निकम यांच्याशी आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी बातचीत केली आहे.
'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरून घेतला आढावा'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चिपळूणमध्ये जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा फोनवरून आढावा घेतला आहे. अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. सध्या चिपळूणममध्ये 25 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच, चिपळूणकरांना कुठेही मदत कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला आहे. या सर्व परिस्थितीबाबत आमदार निकम यांच्याशी आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी बातचीत केली आहे.