महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोध करणारी गावे वगळून ठरलेल्या ठिकाणीच रिफायनरी होणार, दिल्लीत लवकरच बैठक - आमदार नितेश राणे - नानार रिफायनरी प्रकल्प नितेश राणे प्रतिक्रिया

विरोध करणारी गावे वगळून रिफायनरी प्रकल्प ( MLA Nitesh Rane on nanar refinery project ) होणार असून, याबाबत दिल्लीमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

MLA Nitesh Rane on nanar refinery project
नानार रिफायनरी प्रकल्प नितेश राणे प्रतिक्रिया

By

Published : Mar 30, 2022, 10:27 AM IST

सिंधुदुर्ग - विरोध करणारी गावे वगळून रिफायनरी प्रकल्प ( MLA Nitesh Rane on nanar refinery project ) होणार असून, याबाबत दिल्लीमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. नानार ग्रीन रिफायनरी ठरली आहे तेथेचे होणार असल्याचे सांगून विरोध असणारी गावे वगळून हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा भरपूर पाठींबा आहे. केवळ खासदार विनायक राऊत हे एकमेव विरोधक राहीले आहेत, असेही ते म्हणाले.

माहिती देताना आमदार नितेश राणे

हेही वाचा -VIDEO : रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

विनायक राऊत यांच्या विजयात भाजपाचा मोठा वाटा आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचा खासदार असेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते.

नानार आणि नानार लगतच्या विरोध असलेल्या गावांना वगळून ठरलेल्या जागेतच ग्रीन रिफायनरी होणार आहे. याकरिता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कोकणातून आम्ही देखिल जाणार आहोत, असे यावेळी नितेश राणे यांनी सांगितले. रिफायनरीला स्थानिक लोकांचे समर्थन वाढत आहे. हे समर्थन रिफायनरी ठरलेल्या जागेत व्हावी याकरता वाढत असल्याचेही राणे म्हणाले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पर्यटनाबाबत पर्यटन व्यावसायिक व व्यापारीवर्ग यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. मात्र, आम्ही मंजूर केलेली विकासकामे त्यांनी मंजूर केल्याचे जाहीर केले. या विकासकामांना चालना देण्याचे काम केले तर स्वागत करू. त्यांनी पुन्हा जिल्ह्यात येवून बैठक घ्यावी व आंबा तसेच इतर फळांचे अवकाळी पावसाने व वातावरण बदलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती सहकाऱ्यांकडून घ्यावी. त्यांना परत मामाच्या गावाला यायचे असेल, तर आम्हीही राजकारणाची टोपी बाजुला ठेवून विकासकामे करण्यासाठी पुढाकार घेवू, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा -Aditya Thackeray On Nanar Project : लोकांचा भरोसा जिंकून पुढे जाऊ - आदित्य ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details