रत्नागिरी - चिपळूण पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी)आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. संबंधित अधिकारी ऑफिसमध्ये बसून फक्त मिटिंग्स घेत आहेत. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले भास्कर जाधव -
या सगळ्या भयानक पूर परिस्थितीला प्रशासन जबाबदार आहे. चिपळूणमध्ये पूरपरिस्थितीच्या अगोदर सायरन का वाजवला नाही? कुठे होते पोलीस? कुठे होतं प्रशासन? असा सवाल उपस्थित करत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खचलेल्या पूलावर पोलीस बंदोबस्त का नाही? हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता, तरीही तुम्ही का तयारी ठेवली नाहीत? अधिकार तुम्हाला आहेत की आम्हाला असे सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केले.
चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येते. या पुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. लाखो-करोडोंचे नुकसान या पुराने झालेले आहे. चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेले आहे.
जिवनावश्यक वस्तूही गाळात