महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंसोबत १५ वर्षानंतर भेट झाली, आमदार भास्कर जाधव यांचा खुलासा - आमदार भास्कर जाधव

गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव

By

Published : Aug 29, 2019, 8:30 AM IST

Updated : Aug 29, 2019, 10:24 AM IST

रत्नागिरी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट झाली. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच कुटुंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बोलू, असे म्हटले होते. मात्र, त्या गोष्टींचा विपर्यास केला जातो, असे ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव

गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का? -रत्नागिरीतून निवडणूक लढवण्यास प्रसाद लाड इच्छूक, युती होणार की नाही?

उद्धव ठाकरेंसोबत तब्बल १५ वर्षांनी भेट झाली. त्यापूर्वी शरद पवार यांनी मंत्री केल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केले आणि असाच मोठा हो, असा आशीर्वाद दिला होता. शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कधीही भेट झाली नव्हती. गेल्या 2004 च्या निवडणुकीमध्ये माझ्याबाबत जे काही झाले ते का झाले? कशामुळे झाले? याबाबत कधीतरी चर्चा व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे ही भेट झाली. त्यावेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याची कारणे काय? कशामुळे अन्याय झाला? त्याला कोण जबाबदार होते? याविषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाले असल्याचे आमदार जाधव म्हणाले. यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांचे यावेळी पुत्र समीर, विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Aug 29, 2019, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details