रत्नागिरी -केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी, विविध कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, पोस्टल एम्प्लॉइज ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
देशव्यापी बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद; जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी - भारत बंद
जिल्हा परिषदेसमोर केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना (आयटक), जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ, जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी सहभाग घेतला होता. जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगीकरण धोरण थांबवावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, थकीत महागाई भत्ता द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा -स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र बंदला सांगलीत प्रतिसाद