रत्नागिरी -सरकार एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेही बांधिल आहे. त्यामुळे यापुढे आता कारवाई तीव्र केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab On ST Workers Strike ) यांनी एसटी संपावर ( ST Employees Strike ) बोलताना दिला आहे. न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपोत लावण्यास सांगितली आहे. याचा अर्थ न्यायालयाने आम्हाला कारवाई करण्याचे संकेत दिल्याचेही यावेळी परब म्हणाले. ते रविवारी (दि. 26) रत्नागिरीत बोलत होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मंत्रीमंडळाने राज्यापालांना ( Governor Of Maharashtra ) प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे. 28 डिसेंबरला निवडणूक घ्यावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हात उंचावून आणि आवाजी मतदानाने, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचेही परब यांनी रत्नागिरी येथे बोलताना म्हटले आहे. दरम्यान, मला सीबीआयकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. या संदर्भातील बातम्या कोण पुरवते हे मला माहीत नसल्याचे परब म्हणाले.
...तोपर्यंत निवडणुका नको, असा सरकारचा मानस
ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार सोमवारी (दि. 27) अधिवेशनात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) ठराव करत आहे. जोपर्यंत इंम्पिरिकल डाटा जमा होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, असा सरकारचा मानस आहे, असे स्पष्ट मत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले आहे.