रत्नागिरी-ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे अशा फसव्या, कामचुकार विजय वडेट्टीवार या मंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. यांनी ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. त्यामुळे यांची ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशा मंत्र्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
...तर आरक्षण टिकलं असतं - चित्रा वाघ
पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या की, ओबीसींना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे कुटील कारस्थान या सरकारचे चाललेले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, हे फक्त सरकारच्या नाकर्तेपणामूळे झालेलं आहे. इंम्पेरीकल डाटा जर तयार केला गेला असता, तर आरक्षण टिकले असते. मात्र सरकाने तसे केले नाही असा आरोप वाघ यांनी यावेळी केला. दरम्यान मागासवर्ग आयोग गठीत करण्याची जी फाईल होती, ती मुख्यमंत्र्यांकडे 14 महिने धूळखात पडलेली होती. अशी माहिती आमच्याकडे आली होती. तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी एकत्र येत तात्काळ मागासवर्गीय आयोग गठीत करायला हवा होता, आणि इंम्पेरीकल डाटा बनवायला हवा होता. ते झालं नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणासारखेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची माती करायचे काम या सरकारने केल असल्याची टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.
ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम मंत्री वडेट्टीवार करत आहेत - वाघ
ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. 22 दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं होते, आम्ही ओबीसी आयोग गठीत करतो, इंम्पेरीकल डाटा बनवतो, ते त्यांनी अद्याप केलेलं नाही. ओबीसींचे राजकिय आरक्षण काढूनच घ्यायचं, ही सरकारची नीती आहे. त्यामुळे असल्या फसव्या, कामचुकार विजय वडेट्टीवार या मंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, यांनी ओबीसी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. त्यामुळे यांची ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशा मंत्र्यानी राजीनामा घ्यावा, ही आमची मागणी असल्याचं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर भाजपकडून 1000 ठिकाणी चक्काजाम करण्यात येणार असल्याचं चित्रा वाघ यांनी रत्नागिरीत घेतलेल्या परिषदेत म्हणले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवारांनी ओबीसी जनतेची दिशाभूल केली - चित्रा वाघ - Chitra Wagh misled the OBC masses
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या की, ओबीसींना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे कुटील कारस्थान या सरकारचे चाललेले आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाले हे फक्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. इंम्पेरीकल डाटा जर तयार केला गेला असता, तर आरक्षण टिकले असते. मात्र सरकाने तसे केले नाही असा आरोप वाघ यांनी यावेळी केला. वडेट्टीवार ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केल आहे.वडेट्टीवार यांची ताबडतोब मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ
TAGGED:
ओबीसींचे राजकीय आरक्षण