महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आधी दिल्लीत काय चालले याचा विचार करा' - breaking news

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार निवासावरून केलेल्या वक्तव्याचा मंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे. आधी दिल्लीत काय चाललं आहे याचा विचार करा, असे भाजपाच्या भातखळकर यांना मंत्री सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

By

Published : May 7, 2021, 3:45 PM IST

रत्नागिरी -भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार निवासावरून केलेल्या वक्तव्याचा मंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे. आधी दिल्लीत काय चालले आहे याचा विचार करा, असे भाजपाच्या भातखळकर यांना मंत्री सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'आधी दिल्लीत काय चालले याचा विचार करा'
भातखळकरयांचं ट्विट'आमदार हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटींचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेले दिसते. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावे, टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना.' असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. 'मनोरा हे फक्त शिवसेना आमदारांचे निवासस्थान नाही'उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, की 'अशा लोकांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही, आज दिल्लीमध्ये 22 हजार कोटी खर्च करून संसद भवन बांधले जात आहे. 900 कोटी खर्च करून पंतप्रधानांचे निवासस्थान बांधले जात आहे, त्यामुळे आधी दिल्लीत काय चालले आहे याचा विचार करा, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच मनोरा हे फक्त शिवसेना आमदारांचे निवासस्थान नाही, मनोरा हे 288 सर्वपक्षीय आमदार आणि 74 विधानपरिषद आमदार असे सगळ्याचे निवासस्थान आहे. आज आमदारांना देखील मुंबईमध्ये निवसस्थानाची अडचण निर्माण झालेली आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय घेण्यात आला असेल, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट सांगितलेले आहे की एकरकमी आम्ही बारा कोटी लसीचे पैसे भरायला तयार आहोत, असे सामंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!

ABOUT THE AUTHOR

...view details