महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

त्यावेळी हीच मंडळी आंदोलन करून सांगत होती परीक्षा घ्या; अभाविपच्या आंदोलनावर सामंतांची प्रतिक्रिया

पुणे विद्यापीठात अभाविपने केलेल्या आंदोलनाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

minister uday samant
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

By

Published : Oct 29, 2020, 4:49 PM IST

Updated : Oct 29, 2020, 8:35 PM IST

रत्नागिरी -पुणे विद्यापीठात अभाविपने केलेल्या आंदोलनाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा घेताना अनंत अडचणी येणार आहेत हे सांगणारा मी या विभागाचा प्रमुख होतो. त्यावेळी हीच मंडळी मला आंदोलन करून सांगत होती की परीक्षा घेतल्या पाहिजेत. दरम्यान, विद्यापीठांच्या परीक्षा घेताना योग्य पद्धतीने घेतल्या गेल्या का हे पाहण्यासाठी फॅक्ट फायडिंग कमिटीची स्थापन केली आहे. या परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या ज्या ऑनलाइन कंपन्या होत्या त्या योग्य होत्या का? यासाठी सत्यसोधन समिती स्थापन केली आहे, एक महिन्यात या संदर्भातला अहवाल येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला शिवसेना बांधील नाही - सामंत

वाढीव वीज बिलांसदर्भात सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिले आहे. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना बांधील नाही, असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. ज्यांनी टीका केली त्यांनी केली, त्यामुळे लक्ष देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे सुरू असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. वाढील बीलासंदर्भात सरकार संवेदनशील आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे संकेत देखील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

Last Updated : Oct 29, 2020, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details