रत्नागिरी -ज्या लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकून मागच्या सरकारमध्ये राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता. ते विरोधामध्ये बसल्यानंतर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करू लागले आहेत. या गोष्टी चुकीच्या घडत होत्या. मात्र, नाणार रिफायनरीचा विषय आता संपला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ते आज (शनिवारी) रत्नागिरीत बोलत होते.
आम्ही स्थानिकांसोबत -
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की नाणारमध्ये रिफायनरीचा विषय हा संपलेला आहे. ज्या लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऐकून मागच्या सरकारमध्ये नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला होता ते विरोधामध्ये बसल्यानंतर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी व काही गोष्टी घडत होत्या. त्या चुकीच्याच होत्या. तेथील लोकांचा जर पाठिंबा असता तर आमचे काहीच म्हणणे नव्हते. मात्र, स्थानिकांच्या विरोधाला सामोरे जात असताना शिवसेनेची ही भूमिका होती, स्थानिकांबरोबर आम्ही राहू आणि म्हणून तेथील रिफायनरी रद्द झालेली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री