महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सव 2020 : कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबाबत लवकरच निर्णय - उदय सामंत - uday samant on devendra fadnavis

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर कोरोना झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर अशी वेळ येऊच नये, त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

uday samant
उदय सामंत

By

Published : Jul 17, 2020, 9:51 AM IST

Updated : Jul 17, 2020, 11:49 AM IST

रत्नागिरी -कोकणात सध्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी येण्यावरून मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, याबाबत कोकणातील तसेच मुंबईत असणाऱ्या कोकणातील राजकीय नेत्यांची चर्चा झाली आहे. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच याबाबत केंद्र आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सही महत्त्वाच्या ठरणार असल्याचे ते म्हणाले. सामंत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदय सामंत (पालकमंत्री, रत्नागिरी)

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत आता संपत आली आहे. त्यानंतर आता गावातील एका व्यक्तिला प्रशासक नेमले जाणार आहे. याचे अधिकार पालकमंत्री आणि सीईओ यांना देण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. याबाबत विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीही काम नाही. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. त्यांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -'भाजपचे लोक संपर्कात, कोण आहे ते समजल्यास राजकीय भूकंप होईल'

दरम्यान, कोरोना झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत सामंत म्हणाले की, अशी वेळ त्यांच्यावर येऊच नये. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो.

Last Updated : Jul 17, 2020, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details