रत्नागिरी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा दौऱ्यात तिवरे धरण दुर्घटनास्थळी जात सद्यास्थितीची पाहाणी केली. दुर्घटना ग्रस्तांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. तसेच तिवरे गावच्या मंदिरात सामंत यांनी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
तिवरे प्रकल्पग्रस्त भेट; माझ्या हातून कोणाला निलंबित करायला लावू नका- उदय सामंत
बैठकीत तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सोई सुविधांबाबत केलेला हलगर्जीपणा उघड झाला. त्यामुळे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर उदय सामंत चांगलेच भडकले. सामंत यांनी ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली व त्यांना सज्जड दम भरला.
बैठकीत तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सोई सुविधांबाबत केलेला हलगर्जीपणा उघड झाला. त्यामुळे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर उदय सामंत चांगलेच भडकले. सामंत यांनी ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली व त्यांना सज्जड दम भरला. अधिकारी म्हणून तूमची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, तिवरे प्रकल्पग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा. याबाबत तक्रार आलेली मला चालणार नाही. पहिला दिवस आहे म्हणून, नाहीतर मला तुम्हाला निलंबित करायला लावू नका, असा इशारा सामंत यांनी यावेळी दिला. तसेच मंत्री सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासित करत या समस्यांबाबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार. तसेच पुढच्या महिन्यापासून मी स्वतः तिवरेबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा-मंत्री उदय सामंत यांनी नाराज आमदार भास्कर जाधवांची घेतली भेट, चर्चांना उधाण