रत्नागिरी -तौक्ते' चक्रीवादळातील नुकसानग्रस्ताना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून सध्याच्या दरापेक्षा जादा दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शासन आपल्या मागणीचा सकारात्म विचार करेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
माहिती देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 400 ते 500 झाडे पडले उन्मळून; अनेक वाहनांचे नुकसान
सामंत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून तौक्ते वादाळामुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करत आहेत. सकाळी उदय सामंत यांनी नाणीज, पाली, हातखंबा गावांना भेट दिली व तोक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी करत अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्यात. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा एकही पंचनामा राहता कामा नये असे आदेश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, उदय सामंत यांनी मतदारसंघातील खानू ग्रामपंचायतला भेट देऊन नुकसानीबद्दल आढावा घेतला. आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. यावेळी, पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, तहसीलदार, सरपंच गणेश सुवारे व संबंधित उपस्थित होते.
हेही वाचा -इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचं कोरोनाने निधन