महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant : राहुल गांधींचं लक्ष आपल्याकडे राहावं यासाठी नाना पटोले अशी विधानं करतात- मंत्री उदय सामंत - critis on nana patole Ratnagiri

Minister uday samant critis on nana patole Ratnagiri

Minister Uday Samant
उद्योग मंत्री उदय सामंत संवाद साधताना

By

Published : Nov 6, 2022, 10:51 PM IST

रत्नागिरी : शिंदे-फडणवीस सरकार तमाशा सरकार, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देत उद्योग मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत संवाद साधताना

आपल्याकडे लक्ष राहावे म्हणून केली टीका -नाना साहेब पटोले यांचे नेते महाराष्ट्रामध्ये येता आहेत, त्यांचे लक्ष आपल्याकडे राहावे यासाठी या प्रतिक्रिया कालपासून येता आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींचा सगळा फोकस पृथ्वीराज चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, यांच्याकडे जाऊ नये तो स्वतःकडे रहावा. यासाठी नानासाहेब पटोले यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचा सांगत उद्योग मंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

नाना पटोलेंनी केली होती टीका - गेल्या अनेक दिवसांपासून नाना पटोले राज्य सरकारवर निशाणा साधत होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सरकार जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, हे सरकार तमाशा सरकार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details