महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sunil Kedar on Bird Flu Thane : शहापूरमधील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात - मंत्री सुनील केदार - 300 Hens Died

शहापूरमधील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. प्रशासन याबाबत खबरदारी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही. या ठिकाणचे सॅम्पल पुण्याला तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती पशुसवर्धन मंत्री सुनील केदार ( Minister Sunil Kedar over Bird Flu ) यांनी दिली.

Minister Sunil Kedar
मंत्री सुनिल केदार

By

Published : Feb 18, 2022, 1:09 PM IST

रत्नागिरी -शहापूरमधील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. प्रशासन याबाबत खबरदारी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही. या ठिकाणचे सॅम्पल पुण्याला तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती पशुसवर्धन मंत्री सुनील केदार ( Minister Sunil Kedar over Bird Flu ) यांनी दिली. ते आज रत्नागिरी येथे बोलत होते. नुकसानग्रस्तांना धोरणानुसार मदत करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

मंत्री सुनील केदार याबाबत बोलताना

शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ( Bird Flu in Thane ) या फार्ममधील आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याची बाब समोर आल्या आहेत. ( 300 Hens Died ) या घटनेनंतर पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत. ( Thane Veternary Health Department )

मृत व जिवंत कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न -

शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावात मुक्तजीवन नावाने पोल्ट्री फार्म आहे. या फार्म मधील शेडमध्ये देशी कोंबड्या व बदके काल सायंकाळच्या सुमारास अचानक मृत्युमुखी पडत होती. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय अधिकाराला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्या अहवालामध्ये कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले.

शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार -

कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये धाव घेतली. त्यानंतर एक किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार आल्याचे सांगण्यात आले. तर जिल्हा प्रशासनांकडून पुढील निर्देश येईपर्यत या परिसरात कोंबड्या पाळण्यावर बंदी असणार आहे. शिवाय एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि बदके यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details