महाराष्ट्र

maharashtra

'मच्छिमारांना सुधारित निकषांनुसार योग्य भरपाई देणार, एलईडी मासेमारी बंदीचा कायदा लवकरच'

By

Published : Jun 14, 2020, 9:22 PM IST

Updated : Jun 14, 2020, 10:30 PM IST

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल, असे वक्तव्य अस्लम शेख यांनी केले.

ratnagiri
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांची नुकसानग्रस्त भागाला भेट

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल, असे वक्तव्य राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी केले. सोबतच एलईडी मासेमारी बंदीसाठी शासन कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शेख यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज (रविवार) दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, बाणकोट आणि केळशी या भागांना भेट देऊन तेथील मच्छिमार बांधवांशी चर्चा करुन नुकसानीबाबत माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या बोटींच्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी केली.

याबाबतचे पंचनामे करताना मच्छिमार बांधवांच्या असणाऱ्या विमा दाव्यांवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार हे या दौऱ्यात त्यांच्यासमवेत होते. केळशी येथील खाडीमधल्या गाळाचा उपसा लवकरात लवकर करण्यात यावा याबाबतही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मच्छिमार बांधवांच्या डिझेल परताव्याबाबत शासनाने गतिमान पद्धतीने काम केले असून, गेल्या पाच वर्षात थकीत राहिलेली रक्कम डिसेंबर 2019 पूर्वीपर्यंतचा बॅकलॉग भरत सर्वांना अदा केली असल्याचे शेख म्हणाले. सर्व मासेमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे शेक यांनी नागरिकांशी चर्चा करताना सांगितले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांची नुकसानग्रस्त भागाला भेट
Last Updated : Jun 14, 2020, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details