रत्नागिरी - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांची अटक अटळ आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी दिली आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
यावेळी अनिल परब म्हणाले की, ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू मान्य केली आहे. न्यायालयाला असे वाटले असेल की या सर्व गोष्टींमध्ये नितेश राणे यांचा हात आहे, म्हणून जामीन फेटाळला असेल. त्याची पूर्ण रिझिनिंग ऑर्डर मी बघितलेली नाही, परंतु जामीन फेटाळला आहे, त्यामुळे आता अटक अटळ आहे.
- काय आहे प्रकरण?