रत्नागिरी -एसटी विलिनीकरणावर ( ST Merge Issue ) समिती अभ्यास करून निर्णय देणार आहे, त्यामुळे तो मुद्दा आमच्या हातात नाही, असे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. ( Minister Anil Parab Intracted with media on Repuplic day 2022 Ratnagiri )
लोकांना वेठीस धरणे योग्य नाही -
एसटी नुकसानात असतानाही जवळपास ४१ टक्यांची भरीव पगारवाढ कामागारांना दिली आहे. कामगारांशी सतत संपर्क करून देखील काही कामगार विलिनिकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपत नाही आहे. शासन आपल्या परीने संप मिटावा म्हणुन प्रयत्न करत आहे. मात्र, विलिनिकरणाचा मुद्दा उच्च न्यायलयाच्या खंडपीठाने एका समितीसमोर ठेवला आहे. समिती त्यावर अभ्यास करून निर्णय़ देणार आहे. म्हणून तो मुद्दा आमच्या हातात नाही. हे वारंवार आम्ही कर्मचाऱ्यांना समजावून सांगत आहोत. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. लोकांना वेठीला धरणं योग्य नाही. लोकांच्या चुकीच्या पद्धतीने वेठीला धरलं जात आहे, असे मंत्री परब यावेेळी म्हणाले.
राज्यपाल हस्तक्षेप करू शकत नाहीत -
दरम्यान, एसटी विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे त्या समितीच्या व्यतिरिक्त कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. कारण न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ते काम सुरू आहे. त्यामुळेे राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असेही मंत्री परब यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.