रत्नागिरी -दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम वादात सापडले होते. अखेर हे बांधकाम नार्वेकर यांनी स्वतः पाडून टाकण्यास सुरुवात केली आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -रिफायनरी समर्थकांची प्रकल्पाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहचवू - खासदार राऊत
नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड येथे जागा विकत घेऊन या जागेत असलेले पूर्वीचे घर पाडून तेथे नवीन बंगला बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सदर बांधकाम हे अनधिकृत असून ते सीआरझेडमध्ये येत असल्याची तक्रार केली होती. या बंगल्याची पाहणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे अधिकारीही येऊन करून गेले होते, त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान नार्वेकर यांच्या बांधकामाची चौकशी सुरू असून त्यांना अद्याप महसूल प्रशासनाने बांधकाम पाडून टाकण्याची कोणतीही नोटीस दिलेली नाही. असे असतानाही नार्वेकर यांनी स्वत:हून आपल्या बंगल्याचे बांधकाम पाडून टाकण्याचा निर्णय घेतला असून बांधकाम तोडले जात आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर हातोडा