रत्नागिरी - जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरताना पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस पावसाची संततधार सुरू होतीच. मात्र रविवारी रात्रभर पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आज (सोमवार) पहाटेपासून पुन्हा एकदा पाऊसाने जोरदार सुरूवात केली आहे.
रत्नागिरीत पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पहाटेपासून जोरदार पाऊस - रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरणे, दरड कोसळने, जमीन खचणे, रस्ते पाण्याखाली जाणे या घडल्या आहे. अशातच हवामान खात्यानेही अतीमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सर्व नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत.
पावसाची संततधार -
रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरणे, दरड कोसळने, जमीन खचणे, रस्ते पाण्याखाली जाणे या घटना घडल्या आहे. अशातच हवामान खात्यानेही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरीता पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. रात्रीच्या तुलनेत जिल्ह्यात निश्चितच पावसाचा जोर वाढला आहे. शिवाय, पुढील पाच दिवस देखील जिल्ह्यावासीयांना सतर्क राहावे लागणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. पाऊस आज दिवसभर असाच बरसत राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात, तसेच नद्या देखील धोक्याची पातळी ओलांडू शकतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.