महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यापाऱ्याचे अपहरण करुन रोकड लुटणाऱ्या पुण्यातील टोळीला अटक; दिड कोटीचा मुद्देमाल जप्त - रत्नागिरीतील चोरट्यांना अटक

बाजारपेठेतील ओतारी गल्लीतील सोने व्यावसायिकाचे अपहरण करून ३ किलो सोने व ९ लाखांची रोकड लुटणाऱ्या पुण्यातील टोळीस अवघ्या २४ तासात मुद्दमालासह पोलिसांनी अटक ( Gang arrested ratnagiri police ) केली आहे. यात ७ आरोपी असून त्यापैकी दोघेजण चिपळूण व खेड येथील आहेत. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६२ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

Gang arrested ratnagiri police
रत्नागिरीतील चोरट्यांना अटक

By

Published : Mar 9, 2022, 10:03 AM IST

Updated : Mar 9, 2022, 11:05 AM IST

चिपळूण (रत्नागिरी) - बाजारपेठेतील ओतारी गल्लीतील सोने व्यावसायिकाचे अपहरण करून ३ किलो सोने व ९ लाखांची रोकड लुटणाऱ्या पुण्यातील टोळीस अवघ्या २४ तासात मुद्दमालासह पोलिसांनी अटक ( Gang arrested ratnagiri police ) केली आहे. यात ७ आरोपी असून त्यापैकी दोघेजण चिपळूण व खेड येथील आहेत. या आरोपीपैकी काहींवर १० प्रकारचे गुन्हे विविध राज्यात याआधीच दाखल आहेत. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६२ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची प्रतिकिया

आरोपीला अटक -

विशाल रावसाहेब ओहळ (२४, रा. वसगणी गार्डन पिंपरी पुणे), निलेश दिलीप भोईटे (२८, रा. भुपेंद्र चाळ पिंपरी चिंचवड), अजय राजू महाजन (२६, रा. खुजीर गणपती मंदीर पिंपरी चिंचवड), रासबिहारी मिताई मन्ना (३८, खेराडे कॉम्पलेक्स, क्वॉलिटी बेकरी शेजारी चिपळूण, मुळचा पश्चिम बंगाल), आसिम करमुद्दीन परकार (५०, रा. फुरूस फलसोंड, खेड) एकनाथ कृष्णा आवटे ( ६०, शिरूर पुणे) राजेश रामकृष्ण क्षीरसागर ( ५२, तळेगाव दाभाडे पुणे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दिड कोटीचा मुद्देमाल जप्त -

आरोपींकडून दिड कोटीचे सोन्याचे दागिने लगड, कॉइन, ७ लाख ८५ हजार ५०० रुपयांची रोकड, ३ लाख किमतीची होंडा सिव्हिक कार, २ लाखाची टोयाटो कोरोला अलटिस कार, १ हजाराचे एअर पिस्टल व १०० रूपयाचे स्टिल बेडी असा एकूण १ कोटी ६२ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सबंधीत आरोपी हे सराईत असून यापुर्वी त्यांच्यावर महाराष्ट्रात पुणे, बारामती, अकोला, ठाणे, तसेच आसाम राज्यातही विविध १० प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - व्यापाऱ्याचे अपहरण करून घातला दीड कोटींचा गंडा, तोतया आयकर अधिकाऱ्यांचा प्रताप

Last Updated : Mar 9, 2022, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details