महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुराबाबत महसुल, पाटबंधारे अन् हवामान विभागाविरोधात न्यायालयात जाणार- नगराध्यक्ष सुरेखा खेराडे - चिपळूण महापालिका

चिपळूणमध्ये आलेल्या पुरानंतर आता चिपळूण नगरपालिका आक्रमक झाली आहे. कारण पुराबाबत चिपळूणपालिका आता महसूल, पाटबंधारे आणि हवामान विभागाविरोधात न्यायालयात जाणार, अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली.

v
v

By

Published : Aug 7, 2021, 3:28 PM IST

Updated : Aug 7, 2021, 5:29 PM IST

रत्नागिरी -चिपळूणमध्ये आलेल्या पुरानंतर आता चिपळूण नगरपालिका आक्रमक झाली आहे. कारण पुराबाबत चिपळूणपालिका आता महसूल, पाटबंधारे आणि हवामान विभागाविरोधात न्यायालयात जाणार आहे. चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 ऑगस्टला झालेल्या सभेत याबाबतचा निर्णय झाल्याचे चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत तिनही विभाग काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

बोलताना नगराध्यक्ष

पुरानंतर आता चिपळूण नगरपरिषद आक्रमक

जलयम झालेले चिपळूण आठवले की अंगावर शहारे येतात. दरम्यान, चिपळूणच्या पुरानंतर त्याला कारणीभूत असलेल्या बाबींवर विचारमंथन, चर्चा आणि कारणमीमांसा सुरू आहे. स्थानिकांच्या मते कोळकेवाडी धरणातून झालेला पाण्याचा विसर्ग आणि त्यावेळी स्थानिकांना कल्पना दिली नाही, असाही एक मोठा मतप्रवाह दिसून येतो. पण, पाटबंधारे विभागाने मुसळधार पाऊस, भरती, जगबुडी आणि वाशिष्ठीचा संगम याबाबींना चिपळूण पुराला जबाबदार धरले आहे. यानंतर आता चिपळूण नगरपालिकाही आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. याबाबतचा ठराव 5 ऑगस्टच्या सभेत झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -...म्हणून राज्यपाल दौरे करत आहेत - निलेश राणे

Last Updated : Aug 7, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details