महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे, नववर्षाचे जल्लोषात स्वागत - Nilesh Rane

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले अशी चलचित्र देखावे शोभायात्रेत दिसून आले. सामाजिक संदेशही चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे

By

Published : Apr 6, 2019, 2:13 PM IST

रत्नागिरी -साडेतीन मुहुर्तापैक्की एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा सण आहे. हा मराठी नववर्षाच्या सणाचा पहिला दिवस असल्याने घरोघर गुढी उभारण्यात आली. शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी शोभायात्रा काढण्यात आली. ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लक्ष वेधून घेणारे चलचित्रांचे देखावे दिसून आले.

शहव व जिल्ह्यात शोभायात्रेला सकाळपासून सुरुवात झाली. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्थेच्यावतीने दरवर्षी 'गुढीपाडवा शोभायात्रा' जल्लोषात काढण्यात येते. यंदाही शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये शहराची ग्रामदेवता असलेल्या भैरी देवतेच्या पालखीची प्रतिकृतीदेखील दरवर्षीप्रमाणे सहभागी झाल्याचे दिसून आले.

शोभायात्रेत चलचित्रांचे देखावे
ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेनुसार भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत भैरीबुवाच्या प्रांगणात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून शोभायात्रेला सुरुवात झाली. भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंतही शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले अशी चलचित्र देखावे शोभायात्रेत दिसून आले. सामाजिक संदेशही चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.


मारुती मंदिरापासूनही एक शोभयात्रा निघाली. या शोभायात्रेतही चित्ररथांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यात आले. पाणी किती महत्वाचे आहे, हा एक महत्वाचा संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. नरेंद्र महाराज संस्थानच्यावतीनेही काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माजी खासदार निलेश राणे यांनी हजेरी लावली. जिल्ह्यातही नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details