रत्नागिरी -कोकणातील हापुस आंबा देशातील मोठया शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी,बैंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या शहरांमध्ये आंबा महोत्सवांचे आयोजन करुन हापुस आंब्यास मोठया प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत मंत्री महोदयांनी सुचना दिल्या आहेत. आंबा महोत्सवांमुळे परराज्यातील बाजारपेठा आंबा उत्पादकांना उपलब्ध होण्यास मदत होईल.
देशातील 11 शहरांमध्ये होणार आंबा महोत्सव हेही वाचा -महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
शेतकऱ्यांना आवाहन
परराज्यांमधील आंबा महोत्सवामध्ये जे शेतकरी सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी विहित नमुज्यातील अर्ज, 7/12 उतारा (मागील 6 महिन्यातील), ओळखपत्र (आधार कार्ड झेरॉक्स), तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नावे रु. 10.000/- चा धनाकर्षासह आपला अर्ज कृषी पणन मंडळास सादर करावा. अर्जासोबत स्टॉलवर उपस्थित राहणा-या कुटुंबातील व्यक्ती व सहकारी यांचे ओळखपत्रासह शिफारस पत्र शेतक-यांनी देणे आवश्यक आहे. तसेच सहभागी होणा-या शेतक-यांनी अर्जासोबत भौगोलिक मानांकनाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
परराज्यात हापुस आंब्याला बाजारपेठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न
परराज्यात हापुस आंब्याकरीता बाजारपेठ स्थापन करण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नामध्ये कोकणातील शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी आंबा उत्पादकांना केले आहे.
हेही वाचा -Antilia Explosives Scare : 'वाझेंना अंबानीकडून हजारो कोटींची वसूल करायची होती खंडणी'