रत्नागिरी - चिपळूण तालुक्यात मंगळवारी काही ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात गर्मीही वाढली होती. अखेर संध्याकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विशेषतः चिपळूण तालुक्यातल्या खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. यामुळे आंब्याला फटका बसणार आहे.
चिपळूणमध्ये गारांचा पाऊस, आंब्याला फटका बसण्याची शेतकऱ्यांना चिंता - मुसळधार पाऊस
एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पाऊसचाही कहर सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा यावेळी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
चिपळूणमध्ये गारांचा पाऊस, आंब्याला फटका बसण्याची शेतकऱ्यांना चिंता
भिले, केतकी, कालुस्ते या गावांसह इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. मात्र, या पावसामुळेअनेकांची तारांबळ उडाली.
मुसळधार पावसात आंबा गळून पडला आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे.
Last Updated : Apr 15, 2020, 1:13 PM IST