रत्नागिरी - हौसेला मोल नाही, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण रत्नागिरीत एकाने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला आहे. सध्या या व्यक्तीची आणि त्यांच्या मास्कची चर्चा अख्ख्या रत्नागिरीत रंगली आहे.
हौसेला मोल नाही, 'ते' वापरतात चक्क चांदीचा मास्क
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज १० हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकजण खबरदारी बाळगाताना दिसत आहे. त्यासाठी कोणी N95 मास्क, डिझायनर मास्क, तर कोणी अगदी साधे मास्क वापरण्यास पसंती देत आहेत. मात्र, रत्नागिरीत एका व्यक्तीने चक्क खास चांदीचा मास्क तयार करून घेतला आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज १० हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकजण खबरदारी बाळगाताना दिसत आहे. त्यासाठी कोणी N95 मास्क, डिझायनर मास्क, तर कोणी अगदी साधे मास्क वापरण्यास पसंती देत आहेत. मात्र, रत्नागिरीत एका व्यक्तीने चक्क खास चांदीचा मास्क तयार करून घेतला आहे. शेखर सुर्वे, असे त्यांचे नाव आहे. ते रत्नागिरीतील मांडवी येथे राहतात. त्यांना सोन्या-चांदीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्यांनी कोरोना काळात मोबाईलवर चांदीचा मास्क पाहिला. त्यानंतर त्यांच्या सोनाराला विचारून खास कोल्हापूरवरून हा चांदीचा मास्क बनवून घेतला. या मास्कची किंमत ४ हजार रुपये असून त्याचं वजन ६० ग्रॅम इतके आहे. ते असा मास्क वापरणारे पहिलेच व्यक्ती आहेत. केवळ एक हौस म्हणून हा मास्क बनवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी वर्ल्डकप देखील बनवून घेतला होता.