रत्नागिरी- आरोग्य सेवेतील रिक्त पदे तात्काळ भरा, सरळ सेवा भरती करा, पोलीस वसाहतींची दुर्दशा थांबवा यासह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
आरोग्य सेवेसह इतर मागण्यांसाठी समविचारीच्या वतीने लाक्षणिक उपोषण - samvichari manch ratnagiri
पक्षीय अभिनिवेश नसलेल्या समविचारी मंचच्या वतीने १५ ऑगस्ट पासून आरोग्य सेवेतील रिक्त कर्मचारी संख्या त्वरित भरावी म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केल आहे. त्याविषयी शासनाकडून पाठपुरावा करण्यासाठी हे उपोषण असल्याचे समविचारी मंचच्या वतीने सांगण्यात आले.
पक्षीय अभिनिवेश नसलेल्या समविचारी मंचच्या वतीने १५ ऑगस्ट पासून आरोग्य सेवेतील रिक्त कर्मचारी संख्या त्वरित भरावी म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केल आहे. त्याविषयी शासनाकडून पाठपुरावा करण्यासाठी हे उपोषण असल्याचे समविचारी मंचच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे त्वरित भरावीत, विविध कर्ज माफ करावे, भातपिकाच्या नुकसानीचे अद्यावत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या उपोषणासाठी समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा-'मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या मुळाशी जाणार'