रत्नागिरी - जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी निसर्ग चक्रीवादळाच्या दिवशी (3 जून) डिझेलवाहू जहाज येऊन लागले होते. पण, हे जहाज अद्याप देखील काढले गेलेले नाही. त्यासाठी आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांनी ही माहिती दिली. जहाजावरील जवळपास 25 हजार लिटर डिझेल सुरक्षित आहे.
'त्या' जहाजाप्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून संबंधित मालकाला नोटीस... - ratnagiri latest news
मिऱ्या समुद्रकिनारी निसर्ग चक्रीवादळाच्या दिवशी (3 जून) डिझेलवाहू जहाज येऊन लागले होते. पण, हे जहाज अद्याप देखील काढले गेलेले नाही. त्यासाठी आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
नौवहन महानिदेशालयाच्या अधिकाऱ्यामार्फत तपासणी पूर्ण करण्याबरोबरच जहाजाच्या मालकाला नोटीस देवून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जहाज काढण्याच्या सूचना बंदर विभागाकडून देण्यात आल्याचे महानवर यांनी सांगितले. नौकावहन महानिदेशालयाच्या अधिकाऱ्यातर्फे या जहाजाची तपासणी व इतर प्रक्रिया चालू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांनी अमावस्या आहे आणि त्याच दिवशी असलेल्या भरतीच्या दिवशी हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या जहाजवर असलेले 13 कर्मचारी सध्या हॉटेलवर राहत असून, त्यांनी क्वारंटाईन पिरेड देखील पूर्ण केला आहे. भरतीच्या दिवशी जहाज न निघाल्यास या जहाजाला धोक्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.....