रत्नागिरी- तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील हे धरण 2 जुलै 2019 ला फुटले होते. या दुर्घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच धरण नव्याने उभे करण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे.
यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी प्राथमिक टप्प्यात मंजूर झाला आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. सध्या येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी कोयना प्रकल्पांतर्गत अलोरे व नागावे येथे असलेल्या 15 हेक्टर शासकीय जमिनीची निवड करण्यात आली आहे.