रत्नागिरी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या १७ सप्टेंबरला रत्नागिरीत येणार आहे. या दौर्यात त्यांची विराट सभा होणार आहे. सिंधुदुर्गचा दौरा करून राजापूरमार्गे ते सायंकाळी रत्नागिरीत दाखल होतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्गमधून १७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता राजापूर येथे पोहोचतील. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ५.३० वाजता शहरात विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री रात्री शहरातच मुक्काम करणार आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या गत ५ वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात येणार आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठित केल्या जात आहेत.
हेही वाचा-'सेनेचा रिफायनरीला विरोध नाही, पण प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध कायम'
प्रत्येक पदाधिकार्यावर जबाबदारी देण्यात येत आहे. बर्याच काळाने मुख्यमंत्री फडणवीस शहरात येत असल्याने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आणि सभा यशस्वी होण्याकरिता रत्नागिरी जिल्हा भाजप योग्य नियोजन करत आहे, अशी माहिती अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.