रत्नागिरी - पेट्रोल आणि डिझेलवरचे उत्पादन शुल्क कमी करायचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र यामुळे पेट्रोलपंप चालकांचे मात्र दिवाळे निघाले आहे. प्रत्येक पेट्रोलपंप चालकाला याचा फटका बसला आहे. अचानक उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णय़ाने राज्यातील छोट्या पेट्रोल पंप चालकांचे दीड ते दोन लाख तर मोठ्या पेट्रोल पंप चालकांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
इंधन दरवाढीमध्ये त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे अचानक पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोलपंप चालकांचे ऐन दिवाळीत दिवाळे निघाले आहे.
असे झाले नुकसान -
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी आलेले नसताना ही केंद्र सरकारने अचानक इंधनाचे दर कमी करण्याच्या निर्णय़ाने राज्यातील छोट्या पेट्रोल पंप चालकाचे दीड ते दोन लाख तर मोठ्या पेट्रोल पंप चालकांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे. राज्यात सहा हजारांहून अधिक पेट्रोलपंप आहेत, तर देशात 60 हजाराहून अधिक पेट्रोल पंप आहेत. कमीत कमी दोन लाखांचे नुकसान म्हटलं, तर नुकसानीचा आकडा काही हजार कोटींमध्ये जातो. कारण पेट्रोल पंपात असलेल्या स्टाॅकचा साठा दुसऱ्या दिवशी कमी झालेल्या दरांनीच विकावा लागला. त्यात सलग सुट्ट्यांमुळे सर्वच पेट्रोलपंप चालकांनी इंधनाचा स्टॉक करून ठेवला होता, त्यामुळे अचानक इंधनाचे भाव कमी करणे योग्य नसल्याची भूमिका फामपेडा म्हणजे फेडरेशन आँफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
पेट्रोल, डिझेल दरात कपातीने सर्वसामान्यांना दिलासा.. मात्र ऐन दिवाळीत पेट्रोलपंप चालकांचं निघालं दिवाळं - पेट्रोल पंप चालक
केंद्र सरकारने अचानक उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णय़ाने राज्यातील छोट्या पेट्रोल पंप चालकांचे दीड ते दोन लाख तर मोठ्या पेट्रोल पंप चालकांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
Loss of petrol pump operators
हे ही वाचा -"देशाची अर्थव्यवस्था भक्कम" केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची EXCLUSIVE मुलाखत
राज्य सरकारला पेट्रोलपंप चालकांची विनंती -
दरम्यान महाराष्ट्र सरकार राज्यात इंधनाचे दर कमी करू शकते, पण ते कमी करण्याआधी त्याची डेडलाईन ठरवून द्यावी म्हणजे पेट्रोल पंप चालकांना तोटा कमी होईल असं मत देखील उदय लोध यांनी नोंदवले आहे. दरम्यान या सर्व परिस्थिती संदर्भात उदय लोध यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..
Last Updated : Nov 6, 2021, 4:57 PM IST