Look Back 2022 : वर्षभरात विविध घडामोडींनी गाजला रत्नागिरी जिल्हा; वाचा, मागोवा 2022 - Shiv Sena stronghold in Konkan
रत्नागिरी हा जिल्हा नेहमीच तिथल्या राजकीय नेत्यांमुळे चर्चेत ( Shiv Sena stronghold in Konkan ) राहिलेला आहे. राजन साळवी यांना रायगड एसीबीची नोटीस, अनिल परब यांच्या सी कॉंच रिसॉर्टवर कारवाई ही मुद्दा सरत्या वर्षी महत्त्वाचा ठरवला. त्याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर वातानुकूलीत ट्रेन धावली. त्यामुळे आता पर्यटकांसाठी रत्नागिरी हे आणखी आकर्षणाच स्थान ठरले ( Look Back 2022 ) आहे.
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला
रत्नागिरी : वर्षभरातील रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा ( Look Back 2022 ) घेऊयात. यात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेत झालेले बंड, आदित्य ठाकरे यांची संवाद निष्ठा यात्रा, ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचा वरचढपणा ( Shiv Sena stronghold in Konkan ), भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, राजन साळवी यांना रायगड एसीबीची नोटीस हे महत्तवाचे राजकीय विषय ठरेल पाहूयात सविस्तर ( Year Ender 2022 )
- शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील 2 आमदार शिंदे गटात : जून शिवसेनेत झालेल्या बंडात जिल्ह्यातील दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
- आदित्य ठाकरे यांची संवाद निष्ठा यात्रा रत्नागिरीत :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संवाद निष्ठा यात्रा १६ सप्टेंबरला रत्नागिरीत आली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली होती.
- ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट वरचढ : ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर 36 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. 17 ऑक्टोबरला निकाल लागला. यामध्ये एकूण 51 पैकी शिवसेना ठाकरे गटाला 24, शिंदे गटाला 7, भाजप 1 आणि राष्ट्रवादीची 2 जागांवर सरशी झाली. तर इतर 17 ठिकाणी गाव पॅनल आहे. तसेच डिसेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्ह्यात असणारे वर्चस्व पुन्हा सिध्द करीत भगवा फडकवला. तब्बल 101 ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व (Thackeray group prevails Gram Panchayat elections ) मिळवले. शिवसेना ठाकरे गटाने 101 ग्रामपंचायतीवर तर शिंदे गटाने 45 ग्रामपंचायतीवर दावा केला. भाजपाने 19 ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवलं असून, राष्ट्रवादीच्या खात्यात 8 तर काँग्रेसने 3 वर वर्चस्व मिळवले आहे. गावपॅनलने 45 ठिकाणी वर्चस्व (Year Ender 2022 Ratnagiri ) राखलं.
- भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. 18 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना ( attack On Bhaskar Jadhav house ) घडली. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं ( Year Ender 2022 Ratnagiri Politics ) नाही. उद्धव ठाकरेंच्या गटात असलेले आमदार भास्कर जाधव सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला करत असतात. त्यांची आक्रमक विधानं नेहमी चर्चेत असतात. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घराच्या दिशेनं भिरकावण्यात आलेल्या वस्तू सापडल्या. भास्कर जाधव यांच्या घराच्या अंगणात दगड, क्रिकेटचे स्टम्प, पेट्रोल भरलेल्या बॉटल्स सापडल्या. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले. सध्या पोलीस तपास सुरू आहे.
- सी कॉंच रिसॉर्टवर कारवाई : दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट शेजारी असलेल्या वादग्रस्त सी कॉंच रिसॉर्ट पाडण्याचा अखेर 22 नोव्हेंबर रोजी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात (Sea Conch Resort Demolished ) आला.
- वातानुकूलीत कंटेनर ट्रेन : कोकण रेल्वे मार्गावरून 30 नोव्हेंबर रोजी पाहिल्यांदाच वातानुकूलीत कंटेनर ट्रेन (Air condition train in Konkan ) धावली. ही पहिली वातानुकूलित कंटेनर ट्रेन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक संतोषकुमार झा, दिपक गद्रे, विभागिय व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून जेएनपीटीकडे रवाना झाली. रत्नागिरीतून थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या वातानुकूलीत कंटेनर ट्रेनमधून उद्घाटनाच्या पहिल्या फेरीत 250 मेट्रीक टन प्रक्रियायुक्त मासळी पाठवण्यात आली. या कंटेनर ट्रेनमुळे रस्त्याने वाहतुकीतील धोके टाळता येणार आहेत, तसेच वेळ आणि पैशांचीही मोठ्याप्रमाणात बचत होणार आहे.
- राजन साळवी यांना रायगड एसीबीची नोटीस : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक, आमदार राजन साळवी यांना रायगडमधील अलिबागमधल्या एसीबी कार्यालयाने मालमत्ता चौकशीप्रकरणी डिसेंबरमध्ये नोटीस ( Raigad ACB notice to Rajan Salvi ) बजावली. उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता खर्चा संदर्भात जवाब नोंदवण्यासाठी 5 डिसेंबर रोजी राजन साळवी यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र कालावधी कमी असल्याने चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली होती. त्यानुसार 14 डिसेंबरला ते चौकशीला सामोरं गेले. साडेपाच त्यांची चौकशी झाली. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतरही मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी निष्ठावंत राहीलो. शिंदे गटात गेलो नाही, म्हणुन एसीबीची नोटिस मला प्राप्त झाली, शिंदे-फडणवीस सरकारने मला नाहक गोवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आमदार राजन साळवी यांनी केला आहे.
- एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले ( CM Eknath Shinde Ratnagiri tour ) होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले. यावेळी साडेसातशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. बहुचर्चित तारांगणचे उद्घाटनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. तसेच त्यांची जाहीर सभाही झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लांजा नगर पंचायतच्या नगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पाच नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते, आमदार राजन साळवी यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण राजन साळवी यांच्या बालेकिल्ल्यालाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुरुंग लावला.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे डिसेंबरमध्ये 3 ते 6 डिसेंबर दरम्यान रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पक्ष बांधणीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा दौरा होता. राजापूर ते दापोलीपर्यंत त्यांचा दौरा झाला. यावेळी मनसेच्या शाखांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांचा मेळावा व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. कोकणात पक्ष बांधणीसाठी सज्ज व्हा असे भावनिक आवाहन मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. कोकणात संघटनेची मजबूत फळी तयार करण्यासाठी मी कोकणात आलो आहे. यापुढे कोकणात संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचे आहे. यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली.
Last Updated : Jan 1, 2023, 7:23 AM IST