रत्नागिरी - राजापूर शहरात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे राजापूर शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राजापूर शहरात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन हेही वाचा... नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!
गेल्या तीन दिवसांपासून राजापूर शहर परिसरात बिबट्या असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या असल्याचे आढळून आले. रस्ता ओलांडताना या बिबट्याला काही वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.
हेही वाचा... दिल्लीत पुन्हा अग्नीतांडव, नरेला भागातील दोन कारखान्यांना आग
दोन दिवसांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे होत आहे. भक्ष्याच्या शोधात अनेक वेळा बिबटे मानवी वस्तीत येतात. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये पडल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. मात्र आता शहरासारख्या ठिकाणी बिबटे येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात वनविभागाने सापळा लावावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गाझियाबाद महानगरपालिका राबवत आहे स्तुत्य उपक्रम