महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - vehicle

वाहनाच्या जोरदार धडकेमुळेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By

Published : May 4, 2019, 5:11 PM IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज सकाळी मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुरडव गावचे पोलीस पाटील राजा मेने यांना रस्त्याच्या बाजूला हा बिबट्या पडल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बिबट्या अपघातात ठार झाल्याची खबर वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

वाहनाच्या जोरदार धडकेमुळेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगमेश्वर पट्ट्यात सध्या बिबटे सर्रास नजरेस पडतात. अनेक वेळा बिबट्याचा वावर मानवी वस्तीत दिसून येतो. मग कधी भक्ष्याच्या शोधात असेल नाहीतर पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यातच सध्या उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे अनेक वन्य प्राणी तुरळ हरेकरवाडीकडून महामार्गावरून कडवई साळवीवाडी भागाकडे पाण्यासाठी रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ये - जा करताना दिसतात. हा बिबट्या पाण्यासाठीच आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details