रत्नागिरी - लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना मंगळवारी घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता.
रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू - lanja
राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच लांजा तालुक्यातील बेनी गावात एका बिबट्याचा फासकीत अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू
वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. याची माहिती मिळतात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला जिवंत जेरबंद केले होते. मात्र, फासकीत गंभीर जखमी झाल्याने थोड्याच वेळात या बिबट्याचा मृत्यू झाला.