महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू - आसुर्डे

विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे डांगेवाडी येथे घडली.

मृत बिबट्या

By

Published : Apr 16, 2019, 7:54 PM IST

रत्नागिरी- भक्ष्याचा पाठलाग करताना विजेच्या पोलवर चढलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे डांगेवाडी येथे घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.


आसुर्डे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून येतो. सोमवारी रात्री हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना गावातील महावितरणच्या पोलावर चढला. पोलवरील वायरला बिबट्याचा स्पर्श झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या पोलवर बिबट्याची भिस, ओरबडल्याच्या खुणा गावकऱ्यांना दिसल्या. आज सकाळी ही घटना लक्षात येताच नागरिकांनी वनविभाग, पोलीस पाटील आणि महावितरण विभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details