महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत बिबट्याचा लागोपाठ तीन दुचाकीस्वारांवर हल्ला

पिसाळलेल्या बिबट्याने लागोपाठ तिघा दुचाकीस्वारांवर हल्ला केला. सोमवारी रात्री आठ ते नऊ यादरम्यान ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी बिबट्याने याच परिसरात 5 सप्टेंबर रोजी सकाळी एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Sep 16, 2020, 12:58 AM IST

रत्नागिरी - तालुक्यातील मेर्वी बेहेरे टप्पा येथे पिसाळलेल्या बिबट्याने लागोपाठ तिघांवर हल्ला केला. सोमवारी रात्री आठ ते नऊ यादरम्यान ही घटना घडली. लागोपाठ तिघा दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात बिबट्याची एकच दहशत पसरली आहे.

सोमवारी रात्री बेहेरे टप्पा येथे मेर्वी येथून अजय अरुण थुळ माळुंगे येथे जात असताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. तसेच रत्नागिरीतून गावखडी तिकडे जाणारे श्री. पेजे यांच्यावर यांच्या दुचाकीस्वार हल्ला करू त्यांना जखमी केले. तसेच मेर्वी येथील श्रीमती पायल खर्डे ही पावसवरून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवर हल्ला केल्याने पायल खर्डे जखमी झाल्या आहेत. बिबट्या पुन्हा सक्रिय झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा -..तर खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - उदय सामंत

काही दिवसांपूर्वी बिबट्याने याच परिसरात 5 सप्टेंबर रोजी सकाळी एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने याची गंभीर दखल घेतली असून तातडीने मुंबई व पुणे येथून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पथक दाखल झाले. सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या पथकाला यश आले नाही. बिबट्याचा कॅमेरे पिंजरा लावून सुद्धा माग लागला नाही. त्यामुळे पथक माघारी फिरले. पण, आता पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने वन विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details