रत्नागिरी -विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. तसेच, भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठानच्या ऑक्सिजन प्रोजेक्टचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. अशी माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
या दौऱ्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस खेड, चिपळूण नंतर हातखंबा, निवळी, मिरकरवाडा, किल्ला या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पावस आणि राजापूर दौरा करून, पुढे सिंधुदुर्गला जाणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारला भीती आहे. त्यामुळे या भीतीपोटी राज्य सरकारला कोकणातील जनतेला न्याय द्यावाच लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. दरम्यान भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रोजेक्टचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहितीही आमदार लाड यांनी दिली.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या