रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. आजपासून ॲन्टीजेन टेस्टला सुरूवात झाली असून, यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, 17 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 682 झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 60 नवे रुग्ण, एकूण संख्या 1 हजार 130 वर - रत्नागिरी कोरोना न्यूज
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. आजपासून ॲन्टीजेन टेस्टला सुरूवात झाली असून, यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालय येथून 1, कोविड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 12 आणि 4 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, नव्याने सापडलेल्या 60 रुग्णांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालय, रत्नागिरी येथील 11 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 18 रुग्ण, गुहागर - 26 रुग्ण, दापोली - 3, घरडा, खेड येथील एकाचा समावेश आहे. (दरम्यान यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या आता 82 झाली आहे) तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये - 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
रत्नागिरीतल्या मिरकरवाडा येथील 67 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा अनावली, संगमेश्वर येथील असून त्याचे वय 58 वर्षे होते. त्याला मधुमेहचा आजार होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच आज चिपळूण येथील एका 57 वर्षीय रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या आता 40 झाली आहे.
80 ॲक्टीव्ह कन्टेंनमेंट झोन
जिल्ह्यात सध्या 80 ॲक्टीव्ह कनटेंनमेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोलीमध्ये 10 गावांमध्ये, खेडमध्ये 21 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 आणि राजापूर तालुक्यात 4 गावांमध्ये कनटेंनमेंट झोन आहेत.