रत्नागिरी - तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोकणातही कधी नव्हे तो पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मात्र हाच वाढलेला पारा आंबा खवय्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे आंबा झाडावर लवकर तयार होऊ लागला आहे. आंबा लवकर पिकल्याने सध्या स्थानिक बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत. आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
यामुळे हंगामाच्या सुरुवातीला दीड ते अडीच हजार रुपये डझन असा असणारा आंबा आता मात्र १५० रुपये ते ४०० रुपये असा मिळू लागला आहे. यामुळे आंबे खरेदीसाठी स्थानिक बाजारात गर्दी दिसून येत आहे. तापमान वाढल्याने सर्वच जण सध्या गर्मीने हैराण आहेत. पण याच तापमान वाढीचा परिणाम फळांच्या राजावर दिसू लागला आहे. यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोकणात सुद्धा तापमान वाढत आहे. कोकणात दुपारनंतर तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशाच्या मध्ये राहातो. तापमान वाढल्याचा परिणाम हापूस आंब्यावर दिसू लागला आहे. तापमान वाढले तर आंबा लवकर पिकतो. सध्या कोकणात वाढलेल्या तापमानामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. परिणामी आंब्याची आवक वाढली आणि मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आंबा बाजारात येवू लागला आहे. यामुळे आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पाहूया रत्नागिरी बाजारातील आंब्याची स्थिती काय आहे.
वाढत्या उष्णतेचा आंब्यावर परिणाम
हजारो डझन पिकलेला आंबा स्थानिक बाजारात
कच्च्या आंब्यापेक्षा पिकल्या आंब्याची आवक वाढली