रत्नागिरी - दापोली तालुक्यातील भडवले गावालगत डोंगरामध्ये भूस्खलनामुळे सुमारे 10 ते 12 फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 1 हजार लोकवस्ती असलेल्या भडवले या गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिंदेवाडी, देऊळवाडी आणि बौद्धवाडी येथील कुटुंबाना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दापोलीतल्या भडवले गावालगत डोंगराला 12 फूट खोल भेगा - देऊळवाडी
दापोली तालुक्यातील भडवले गावालगत डोंगरामध्ये भूस्खलनामुळे सुमारे 10 ते 12 फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 1 हजार लोकवस्ती असलेल्या भडवले या गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिंदेवाडी, देऊळवाडी आणि बौद्धवाडी येथील कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दापोलीतल्या भडवले गावालगत डोंगराला 12 फूट खोल भेगा
डोंगराला भेगा पडल्याने काही झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. भेगांमुळे डोंगरावर ठिकठिकाणी जमीन दलदल झाली आहे. त्यामुळे बागायती, भातशेतीकडे जाताना ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.