रत्नागिरी -अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यानंतर आता खेड तालुक्यातही काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत.
खेड तालुक्यातील दहीवली गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत. काही दिवसांत पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जमिनीला या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी जमीन खचली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या भागाची पाहणी करण्यात आली असून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.