रत्नागिरी- मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द येथील करंजीकर मोहल्ल्यातील घरांवर आज दरड कोसळली. यामध्ये तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून इतरही काही घरांच नुकसान झाले आहे. तर या घटनेत एक महिला जखमी झाली आहे.
कालुस्ते खुर्दमध्ये घरांवर कोसळली दरड; एक महिला जखमी - Abdul Qadir Bijle
दरड पडल्यामुळे घरात झालेल्या माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्यात हलीमा अब्दुल कादिर परकार फसल्या होत्या. त्या जखमी झाल्या असून त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून काढण्यासाठी नंदकिशोर गुढेकर व अमिन अब्दुल कादिर बिजले यांनी प्रयत्न केले.
![कालुस्ते खुर्दमध्ये घरांवर कोसळली दरड; एक महिला जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3842740-thumbnail-3x2-jh.jpg)
उत्तर रत्नागिरीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कालुस्ते खुर्द येथे दरड कोसळली आहे. यात घरांचे नुकसान झाले असून एक महिला जखमी झाली आहे. मंजूर परकार, अली परकार, सुलतान परकार, हलीमा अब्दुल कादिर परकार, सल्लादिन परकार, नजीर परकार, फईन परकार, यांच्या घरावर ही दरड कोसळली आहे. दरड पडल्यामुळे हलीमा अब्दुल कादिर परकार यांच्या घरात चिखल व माती शिरली होती. माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्यात त्या कंबरभर फसल्या होत्या. त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यासाठी नंदकिशोर गुढेकर व अमिन अब्दुल कादिर बिजले यांनी प्रयत्न केले. या घटनेत हलीमा परकार जखमी झाल्या.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप व अधिकाऱ्यांनी तातडीने भेट दिली. तसेच चिपळूण तालुक्यातील आमदार चव्हाण, माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान माजी जिल्हापरिषद सदस्य शौकतभाई परकार, कालुस्ते व येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन दरड उपसण्याचे काम केले.