महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधार्‍याला पुन्हा भगदाड - रत्नागिरी 'क्यार’ वादळा

क्यार वादळाचा किनारी भागावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन समुद्राला मोठे उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही किनारी भागामध्ये शुुक्रवारी दुपारी उधाणामुळे अजस्र लाटा उसळत होत्या.

'क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा

By

Published : Oct 25, 2019, 8:36 PM IST

रत्नागिरी -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ वादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. अजस्र लाटांनी किनार्‍याला तडाखा बसला आहे. रत्नागिरीच्या मांडवी किनारपट्टीतही समुद्राचे पाणी घरात घुसले. तसेच या वादळाचा फटका हा गणपतीपुळे देवस्थानला देखील बसला असून संरक्षक भिंतीवर अजस्त्र लाटांचा तडाखा बसत होता.

'क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा

हेही वाचा - तरुणीला जिवंत जाळणाऱ्या १६ दोषींना दोन महिन्यांच्या आत मृत्युदंडाची शिक्षा

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर, बोर्या बंदर या ठिकाणी देखील लाटांचा मारा अधिक होता. तसेच हर्णे, आंजर्ले आणि दाभोळ किनारपट्टीला देखील याचा फटका बसला आहे. या उधाणामुळे रत्नागिरीतल्या मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधार्‍याला पंधरामाड येथे पुन्हा भगदाड पडले आहे. कंपाऊंडमध्ये समुद्राचे पाणी शिरले असून सुमारे चार ते पाच माडाची झाडे मोडली आहेत. वादळाचा परिणाम असाच राहिला तर पाणी जवळच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. किनारी भागातील नागरिकांना तसा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

क्यार वादळाचा किनारी भागावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन समुद्राला मोठे उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही किनारी भागामध्ये शुुक्रवारी दुपारी उधाणामुळे अजस्र लाटा उसळत होत्या. त्यामुळे वाळु वाहुन गेल्याने मोठा खड्डा पडला आहे. वादळाचा परिणाम असाच राहिल्यास या भागात समुद्राचे पाणी शिरल्याशिवय राहणार नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा - 'एक नारी, पड गयी सब पर भारी'... प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष!

ABOUT THE AUTHOR

...view details