कोझिकोड ट्रेन जळीत प्रकरणी आरोपीला घेऊन केरळ पोलीस रवाना रत्नागिरी :महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस ) केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने मंगळवारी रात्री उशिरा रत्नागिरी येथून एकाला अटक केली आहे. केरळमधील रेल्वे आगीप्रकरणी पोलिस या आरोपीचा शोध घेत होते. ओरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती एटीएसचे अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
गुन्ह्याची कबुली : महाराष्ट्र एटीएसचे वरिष्ठ अधिकारी महेश पाटील यांनी आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरीतील रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र एटीएसचे वरिष्ठ अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले की, केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.
रत्नागिरीतील स्थानकातून पोलिसांनी केली अटक :प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे, केरळ येथील कालिकत रेल्वेला आग लावल्या प्रकरणी आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरीतील रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शाहरुख सैफी वय २७ वर्षे, राहणारा शाहीन बाग, जामीया नगर, ओखला, साऊथ दिल्ली हा रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयातून औषधोपचार घेवून फरार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आरोपी शाहरुख सैफीला महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि रत्नागिरी पोलीस ठाणे येथील अँटी टेरेरिस्ट सेलच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
आरोपी केरळ एटीएसच्या ताब्यात : महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोटोरोला कंपनीचा फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटक बँकेचे एटीएम कार्ड इत्यादी साहित्य सापडले. एटीएसच्या पोलिसांनी आरोपी शाहरुखकडील साहित्य जप्त केले आहे. शाहरुख सैफी आरोपीने केरळ येथे गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास ताब्यात घेवून केरळ ए.टी.एम. पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला पुढील तपासाकरीता केरळ ए.टी.एस. पथक घेवून रवाना झाले आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी पोलीस ठाणे येथील एंटी टेररिस्ट सेल (ए.टी.सी.) पथकांकडून संयुक्तपणे करण्यात आली आहे.
हेही वाचा - High Court : शासनाच्या निधी वाटपाला उच्च न्यायालयाचा ब्रेक, आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश