रत्नागिरी - राज्यात होळी उत्सवाची धूम पहायला मिळत आहे. तर इकडे कोकणात होळी उत्सवाचे दोन प्रकार पहायला मिळतात. त्रयोदशीच्या होळीनंतर सोमवारी रात्री पौर्णिमेचे होम लागले. तर पौर्णिमा संपल्यानंतर जे होम लागतात त्यांना भद्रेचे होम असे म्हटले जाते.
कोकणात होळी उत्सवाला फार महत्व आहे. त्यामुळे कोकणात तेरसे शिमगे म्हणजे त्रयोदशीला होळी उभी राहते. तर दुसरा शिमगा पौर्णिमेचा, म्हणजे पौर्णिमेच्या रात्री होळी उभी करण्याचा अनोखा सोहळा रंगतो. पौर्णिमा संपण्याच्या आत हा होम (होळी) पेटवावा लागतो. चिपळूण तालुक्यातील भिले गावातही पौर्णिमेचा होम पेटवला जातो. त्याअगोदर होम (होळी) भोवती श्री महादेव काळेश्वरी-भानोबाच्या पालखीसह प्रदक्षिणा मारल्या जातात. त्यानंतर होम (होळी) पेटवला जातो. त्यानंतर पालखी नाचवली जाते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित असतात.